राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे घटित समिती समोर चर्चेसाठी उपस्थित राहण्याबाबत..

दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठीउपाययोजना सुचवण्याकरिता 
                 शासन किती वेळा नुसती चर्चा करणार आहे आणि माहिती देणार आहे. किती दिवस असे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहणार आहे. ठाम निर्णय कधी घेतलं जाणार आहे. जर ठाम निर्णय घेण्यासाठी नुसती चर्चा करून चालणार नाही आता संघटनेला ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे..

Popular posts from this blog

Privacy policy

*जुनी पेंशन आणि फसलेले आंदोलन* राज्यभरातील विविध कर्मचारी संघटना यांनी 14 मार्च रोजी बेमुदत संप सुरू केला. या संपामुळे सर्व सामान्य जनतेचे अतोनात हाल होताना दिसत होते सर्व सरकारी कार्यालय वोस पडली होती कुठेच कर्मचारी दिसत नव्हते . सर्व न्यूज चॅनेल वर एकच बातमी प्रसिद्ध होती सरकारी कर्मचाऱ्यांचे जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी चालू केलेला संप , सर्व सामान्य लोकांचा याला प्रतिसाद मिळत नसला तरी , आंदोलनाचा सरकार वर खूप मोठा दबाव निर्माण करण्यात हे आंदोलन यशस्वी झाले होते तसेच विविध अधिकारी सुद्धा या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठींबा देत होते. तसेच राजपत्रित अधिकारी यांच्या संघटने सुद्धा सरकारला आंदोलनाचा इशारा देऊन लवकरात लवकर जुनी पेंशन योजना लागू करावी यासाठी सरकार वर दबाव निर्माण केला होता . आणि आता आंदोलन यशस्वी होईल आणि जुनी पेंशन योजना लागू होईल असेच सर्वांना वाटत असताना. कुठे माशी शिंकली समजली नाही आणि सात दिवस चाललेला संप अचानक मागे घेण्यात आला . या संपाने काय साध्या केलं बर. 1) संघटनेची शक्ती काय असते हे सर्व कर्मचारी वर्गाला समजल 2) संघटनेच्या प्रमुखाने सर्व कर्मचारी वर्गाला बरोबर घेऊन निर्णय घेणे आवश्यक असते त्याच बरोबर प्रमुखाने दगा पटका केला तर कशा प्रकारे आपले आंदोलनं यशस्वी करता आले पाहिजे 3) सरकारच्या भूलथापाला बळी न पडता त्यामधील बारकावे समजून घेता आले पाहिजे