आधार कार्ड व्हलीड इन व्व्हलिड मध्ये शिक्षकांचा बळी देणार का..?
शिक्षक भरती करण्यासाठी त्या शाळेतील विद्यार्थी संख्या आधारे संच मान्यता करण्यात व त्याप्रमाणात शिक्षक उपलब्ध करून देण्यात येते.विद्यार्थी संख्या ही आधार कार्ड नोंदणी वरून करण्याचा नवीन घाट शिक्षण विभागने सुरू केला आहे, त्यामुळे टीसी पेक्षा आधार कार्ड लं महत्व आले आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी पडू नये यासाठी आधार कार्ड नोंदणी केली जात आहे पण त्यात खुप साऱ्या अडचणीचा सामना शिक्षकांना करावा लागत आहे. विद्यार्थाचे आधार कार्ड सरल मध्ये नोंदणी करताना त्यात मोठ्या अडचणी येत आहेत . खुप साऱ्या विद्यार्थाचे आधार कार्ड वरील नावा मध्ये बदल आहेत, इंग्लिश मधील स्पेलिंग मध्ये बदल आहेत, जन्म तारीख मध्ये बदल, मेल,फिमेल मध्ये बदल आहेत यासारखा असंख्य अडचणी येत असतात. सरल वर माहिती भरत असताना यासारखा विविध अडचणीचा सामना शिक्षकांना करावा लागत आहे. खुप साऱ्या विद्यार्थाचे आधार कार्ड अपडेट नाहीत, यामुळे विद्यार्थी संख्या कमी होत आहे व त्याचे परिणाम शाळेवर शिक्षक संख्या कमी होण्याची भीती आहे. त्याचं बरोबर नवीन शिक्षक भरती करताना अडचणी निर्माण होणार आहे..