राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार राजकारण आणि राजीनामा..!!

 काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिनांक 2 मे रोजी यांनी  पुस्तक प्रकाशन निमित आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना आपलं 1 मे 1960 ते आज 2 मे 2023 पर्यंत केलेला राजकिय प्रवास सांगितल आणि आज आपण राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आणि पूर्ण सभागृहात जमलेले कार्यकर्ता यांना आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता, एकच कल्लोळ झालेला आपल्याला पाहायला मिळाला नंतर सर्व राष्ट्र वादी प्रमुख नेत्यांना जवळ बोलून प्रत्येकाने आपापल्या मते व्यक्त केली त्यात सर्वात गाजलेली मत एक जयंत पाटील आणि दुसरे अजित पवार  जयंत पाटील हे किती भावनिक आहेत हे काल पूर्ण महाराष्ट्राने पाहिले शरद पवार यांनी राजीनामाच फेर विचार करावा हे सांगताना त्यांना आपल्या डोळ्यात पाणी कधी आले हे समजले च नाही
      जयंत पाटील यांनी बोलताना एक बाब इथे स्पष्ट केले तुम्ही नाहीतर आम्ही नाही त्यांनी आपला निर्णय सांगितला जर साहेब राहत नसतील तर आम्ही कशाला राहणार यावरून त्यांनी पुढील राजकीय क्षेत्रात काय होऊ शकते याची जाणीव करून दिली  आहे .
                                     दुसरे म्हणजे अजित दादा पवार यांच्या बोलण्याची काल सर्व माध्यमांमध्ये चर्चा होते दादा आणि पुन्हा एकदा सिद्ध केले की मला अजित दादा का म्हणतात ज्या शब्दांमध्ये त्यांनी कार्यकर्ते आणि सुप्रियाताई सुळे यांना शांत केले त्यावरून ते दिसले व त्यांना  अध्यक्ष पदावर किती आपला अधिकार आहे हेही कालच्या बोलण्यातून स्पष्ट होते,  उद्या जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुप्रियाताई सुळे झाल्या तरी दादा बोलल्यानंतर सुप्रिया ताई ची सुद्धा बोलण्याची हिंमत नाही ही कालच्या बोलण्यातून दिसून आले ,अजित दादा पवार यांना अध्यक्षपदावर विराजमान होण्याची किती घाई झालेली आहे हे त्यांच्या बोलण्यावरून  दिसत होते. येणारा काळच सांगू शकतो शरद पवार आपला राजीनामा मागे घेतील की  राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोण असेल 

Popular posts from this blog

*सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इतिहास घडविला...

मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण करिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती - भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना 2023-2024 या वर्षामध्ये मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारी साठी मोफत ऑफलाईन व ऑनलाईन अनिवासी पद्धतीने महा ज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे..

*जुनी पेंशन आणि फसलेले आंदोलन* राज्यभरातील विविध कर्मचारी संघटना यांनी 14 मार्च रोजी बेमुदत संप सुरू केला. या संपामुळे सर्व सामान्य जनतेचे अतोनात हाल होताना दिसत होते सर्व सरकारी कार्यालय वोस पडली होती कुठेच कर्मचारी दिसत नव्हते . सर्व न्यूज चॅनेल वर एकच बातमी प्रसिद्ध होती सरकारी कर्मचाऱ्यांचे जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी चालू केलेला संप , सर्व सामान्य लोकांचा याला प्रतिसाद मिळत नसला तरी , आंदोलनाचा सरकार वर खूप मोठा दबाव निर्माण करण्यात हे आंदोलन यशस्वी झाले होते तसेच विविध अधिकारी सुद्धा या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठींबा देत होते. तसेच राजपत्रित अधिकारी यांच्या संघटने सुद्धा सरकारला आंदोलनाचा इशारा देऊन लवकरात लवकर जुनी पेंशन योजना लागू करावी यासाठी सरकार वर दबाव निर्माण केला होता . आणि आता आंदोलन यशस्वी होईल आणि जुनी पेंशन योजना लागू होईल असेच सर्वांना वाटत असताना. कुठे माशी शिंकली समजली नाही आणि सात दिवस चाललेला संप अचानक मागे घेण्यात आला . या संपाने काय साध्या केलं बर. 1) संघटनेची शक्ती काय असते हे सर्व कर्मचारी वर्गाला समजल 2) संघटनेच्या प्रमुखाने सर्व कर्मचारी वर्गाला बरोबर घेऊन निर्णय घेणे आवश्यक असते त्याच बरोबर प्रमुखाने दगा पटका केला तर कशा प्रकारे आपले आंदोलनं यशस्वी करता आले पाहिजे 3) सरकारच्या भूलथापाला बळी न पडता त्यामधील बारकावे समजून घेता आले पाहिजे