शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना ( शिंदे गट) आणि टपरी वरील चर्चा..!!
आज प्रत्येक नूज चॅनल वर दररोज एकच बातमी प्रसिद्ध होताना दिसत आहे , शिंदे गट यांनी स्थापन केलेली सरकार कीती दिवस राहणार आज प्रत्येक पान टपरी असू की जिथे चार -पाच लोक जमा होतात तिथे एकच चर्चा पाहायला मिळते की भाजपने सरकार स्थापन केलेली बरोबर की चूक यावरच प्रत्येक जण आप आपले मत व्यक्त करताना लोक दिसत आहेत. पण खरच चर्चा करून यावरून काही साध्या होणार आहे का नक्कीच नाही, तरी एक विरंगुळा म्हणून प्रत्येक जण आपापल्या मते कोण किती बरोबर आहे हे सांगताना दिसते आहे.. उद्या कदाचित हे दोघे एकत्र येतील आणि सांगितल की ते एक आमचा राजकीय प्रयोग होता जे आम्हला काही राजकीय पक्षांना शांत करण्यासाठी केला गेला होता..