सावधान व्हा नेत्यांनो..!!
*सावधान व्हा नेत्यानो...*
8 एप्रिल रोजी शरद पवार साहेब यांच्या निवास स्थानी एस. टी. कर्मचारी यांनी जे उग्र आंदोलन केलं त्याचे पडसात सर्वीकडे पहायला मिळते आहे.आंदोलन कर्त्याना या प्रकारे उग्र का व्हावे लागले याचा कोणी का विचार करत नाही..??आंदोलन कर्तव्य करता वेळेस काही कर्मचारी यांना नाईलाजास्तव नको ते पाऊल उचलावे लागेल, कशामुळे याची दखल पहिलीच घेतली असती तर हे आंदोलन झाले असते का आज आपण पाहतो महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारणी भ्रष्टाचाराने भ्रष्टाचाराने बरोबर पाच वर्षातच करोडोंची संपत्ती गोळा करत आहे कोणाच्या जीवनात आणि सर्वसामान्य माणूस वीस वीस पंचवीस वर्षे आपली पूर्ण हायात यामध्ये घालून त्याला साधा घर बांधता येत नाही ही शोकांतिका आहे. राजकारणातील कोणी सुद्धा सर्वसामान्य जनतेकडे लक्ष द्यायला तयार नाही,आज सहा महिने होत आहे एसटी महामंडळातील कर्मचारी आंदोलनाला बसले खूप सारे हाल होत आहेत आज सहा महिने झाले त्यांना पगार नाही त्यांचे कुटुंब हवालदिल झाले पण कोणालाही त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही जो तो एकमेकांच्या अंगावर चिखलफेक करण्यात मशगुल आहे मग तो सत्तेतील असेल किंवा विरोधी पक्ष प्रत्येक सामान्य माणूस या राजकारणाला कंटाळा आहे त्यांना कुठेतरी हे थाबवे असच वाटतं पण सर्व राजकारणी एकाच माळेचे मणी झाले आहे सर्वांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आज युवा तरुण रोजगार नाही म्हणून निराशेत गेलाय मानसिक दृष्ट्या रुग्ण होतायेत ,बेरोजगारी अति प्रमाणात वाढलेली कुणाला पण यांच्याकडे बघण्यासाठी वेळ मिळत नाही आज लाखो लोक कोरोना या महामारी मुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाले आहेत
समाजातील महत्त्वाचा घटक ज्यांच्यामुळे समाजाची प्रगती होते तो शिक्षक आज वीस वर्ष झाले पगार नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झाले आहे विविध ठिकाणी त्यांचे आंदोलन चालू आहे काहीजण समशान भूमी आंदोलन करत आहे त्यांचेसुद्धा कोणी दखल घेत नाही त्याच बरोबर, शिक्षक भरती 2017 पासून सुरू झाली पण अजून पण ती पूर्ण करताना आली नाही याला जबाबदार कोण अधिकाऱ्या बरोबरच सत्तेतील मंत्री आहेत यामध्ये कोरोडो रुपयाच्या घोटाळा झाला आहे पण अजून हि मुख्य सूत्र धार कोण याचा पत्ता लागत नाही जे भेटले त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नाही यामुळे लाखो विद्यार्थी चे नुकसान झाले त्याला जबाबदार कोण त्यामुळे लाखो विद्यार्थी मानसिक दृष्ट्या कमकुवत होत आहेत. विविध विभागातील भरती प्रक्रिया ही भ्रष्टाचाराने माखलेले आहे.
त्यावर कोणालाही तोडगा काढता येत नाही नवयुवक तरुण हतबल झालाय काय करावे हे त्यांना समजते नाही आणि सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष एकमेकावर चिखलफेक करण्यात गुंतला आहे त्यांना सर्वसामान्याचे काय घेणेदेणे नाही स्पर्धा परीक्षा करणारे विविध विद्यार्थी आज आत्महत्या करताहेत तरुण पिढी वैफल्य ग्रस्त झाली आहे त्यामुळे आंदोलन करणारे असे उग्र आंदोलन करणारच किती दिवस शांततेच्या मार्गाने आंदोलन करून निवेदन देणार उपोषण करणार त्यामुळे काही मिळणार नाही ही त्यांना माहीत आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षातील नेते असो त्यांना अशा घटनांना समोर जावेच लागेल जर त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडले नाही तर असे प्रकरण यापुढे खूप सारे घडतील आणि त्याला ही नेते मंडळीच जबाबदार असणार..!!