भारतीयांनो आपण काय करत आहे याचे आत्मपरीक्षण करा..!!


       आज भारत देश एका  महामारी मुळे त्रस्त झाला प्रत्येक जन काळजीत आहे . आज आपण यातून सुरक्षित कसे राहू अशी प्रतेकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामध्ये भर पडली आहे . ती मिडीया ची आज प्रत्येक न्यूज चॅनल वाले लोकांच्या मनात भीती निर्माण करत आहे. ते का करणार नाही मना त्या शिवाय त्यांचा टीआरपी कसा वाढणार हे तर त्याचा व्यवसाय आहे .
 पण प्रश्न हा त्याचा नाही प्रश्न आहे कोरोना महामारी मधून लोकांना कसे वाचवाचा यामध्ये जे हॉस्पिटल मध्ये आहेत त्याचे मनोधर्य कसे वाढवायचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे. कारण हॉस्पिटल मध्ये त्यांच्या सोबत कोणी नाही ,आहे तो एक मोबाईल यातूनच त्यानं त्याच्या विरंगुळा म्हणून कामी येतं आहे पण आज आपण  विविध सोशल मीडिया मधून त्यामध्ये व्हाट्सअप हा जास्त प्रमाणात वापरतो . त्यामधे विविध ग्रुप मधून आपल्याला आपल्या गावातील तालुक्यातील कीवा इतर सर्व ठिकाणची माहिती मिळते त्यामुळे सर्व त्याचा वापर करतात . आज आपण बागितल तर विविध गावातील गाव पुढारी  असो की कार्यकर्ते  ते कोणत्याही पक्षाचे असो मग लोकांना मदत करायचे सोडून केंद्रातील मोदी सरकार सरकार असो किंवा राज्य सरकार हे  कसे  अपयशी ठरले हे लोकांना सांगण्यासाठी विविध भीतीदायक व्हिडिओ यांचा प्रसार करत आहे . यामध्ये लोकांना ऑक्सीजन नसल्यामुळे किवा बेड मिळत नसल्यामुळे लोकांचे जीव जात आहेत अशा प्रकारे विविध व्हिडिओ यांचा प्रसार हे गाव पुढारी करत आहेत. पण आपल्या गावातील लोकांना आपण या महामारी तून कशी मदत करू शकतो हे का या लोकांना सुचत नसेल बर..
 सरकार ला या माध्यमातून   अशी विनंती करतो की असे व्हिडिओ प्रसार करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी जनेकरुन अशा भीतीदायक वातावरण निर्माण करण्याचं कुणाची  हिमत होणार नाही व सरकारची बदनामी सुद्धा होणार नाही..!!

Popular posts from this blog

Privacy policy

*जुनी पेंशन आणि फसलेले आंदोलन* राज्यभरातील विविध कर्मचारी संघटना यांनी 14 मार्च रोजी बेमुदत संप सुरू केला. या संपामुळे सर्व सामान्य जनतेचे अतोनात हाल होताना दिसत होते सर्व सरकारी कार्यालय वोस पडली होती कुठेच कर्मचारी दिसत नव्हते . सर्व न्यूज चॅनेल वर एकच बातमी प्रसिद्ध होती सरकारी कर्मचाऱ्यांचे जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी चालू केलेला संप , सर्व सामान्य लोकांचा याला प्रतिसाद मिळत नसला तरी , आंदोलनाचा सरकार वर खूप मोठा दबाव निर्माण करण्यात हे आंदोलन यशस्वी झाले होते तसेच विविध अधिकारी सुद्धा या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठींबा देत होते. तसेच राजपत्रित अधिकारी यांच्या संघटने सुद्धा सरकारला आंदोलनाचा इशारा देऊन लवकरात लवकर जुनी पेंशन योजना लागू करावी यासाठी सरकार वर दबाव निर्माण केला होता . आणि आता आंदोलन यशस्वी होईल आणि जुनी पेंशन योजना लागू होईल असेच सर्वांना वाटत असताना. कुठे माशी शिंकली समजली नाही आणि सात दिवस चाललेला संप अचानक मागे घेण्यात आला . या संपाने काय साध्या केलं बर. 1) संघटनेची शक्ती काय असते हे सर्व कर्मचारी वर्गाला समजल 2) संघटनेच्या प्रमुखाने सर्व कर्मचारी वर्गाला बरोबर घेऊन निर्णय घेणे आवश्यक असते त्याच बरोबर प्रमुखाने दगा पटका केला तर कशा प्रकारे आपले आंदोलनं यशस्वी करता आले पाहिजे 3) सरकारच्या भूलथापाला बळी न पडता त्यामधील बारकावे समजून घेता आले पाहिजे